अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्र.१४ मधील ओपन स्पेस (खुले भूखंड) वरील व रस्त्यांच्या आजूबाजूला पावसाळ्यात काटेरी झाडे व गाजर गवत मोठ्या प्रमाणात वाढले होते. आ.कृषिभूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेविका कमलबाई पाटील यांच्या पाठपुराव्याने जेसीबी मशीनच्या साहाय्याने काटेरी झाडे व गाजरे गवत काढण्यात आले.
तसेच शहरात काही ठिकाणी जेसीबी मशीन द्वारे न निघालेले गवत नगरपरिषद कर्मचाऱ्यां मार्फत काढून प्रभागातील सर्व ओपन स्पेस मध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असून कामाच्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते रवि पाटील, मूकादम गोपाल गजरे, कमलेश पाटील, विजय पाटील व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.