जळगाव (प्रतिनिधी) भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेला जोरदार दिलेल्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झालाय. याबाबत तालुका पोलीस स्थानकात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक आसे की, दि १० फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास जळगाव ते किनोद रोडवरील धानोरा शिवारातील वसंत हरी सोनवणे यांच्या शेताच्या समोर रोडच्या कडेला सार्वजनिक जागी मुन्नीबाई सरफिया बारेला (वय ४०) या उभ्या होत्या. याचवेळी मारोती इको कार क्रमांक (एम एच -१९-ऐ एक्स ६०५५) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थीकडे दुर्लक्ष करुन मुन्नीबाई यांना समोरून धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मुन्नीबाई यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरफिया कालूसिंग बारेला (वय ५३ रा. आस्थानगरी कीनॊद ता. जि. जळगाव मुळ रा. उमेदडा ता. बडवाणी मध्यप्रदेश) यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.