अमळनेर (प्रतिनिधी) येथील अमळनेर महिला मंच ट्रस्ट आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला उत्सव म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त येथील हनुमान रिसॉर्ट मध्ये “मी अनुभवलेली सावित्री” याविषयावर परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार स्मिता वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिभा शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंचच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा मुट्ठे यांनी केले तसेच त्या म्हणाल्या की महिला एकत्र याव्यात म्हणून या मंचाची स्थापना केली. असून महिलांच्या आरोग्यपासून तर व्यायामपर्यंत सर्व गोष्टी लक्षात ठेवता हे पाऊल उचललं त्यास अमळनेरतील भगिनींनी साथ दिली. परिसंवादाच्या सुरुवातीला प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती राणे, धरणगाव येथील कल्पिता पाटील, ऍड ललिता पाटील, विद्या हजारे, डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी आपापल्या दृष्टिकोनातून या विषयावर प्रकाश टाकला. तदनंतर कार्यक्रमाच्या उदघाटक लोकसंघर्ष मोर्च्याच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासुन महिलांमध्ये राहून काम करत असून महिला या सर्वपरिस्थितीतून मार्ग काढत असतात असे सांगितले. तर अध्यक्षीय भाषणात माजी आमदार स्मिता वाघ यांनी मी राजकारणात अनेकवर्षांपासून असून महिलांनी आत्ता चूल आणि मूल ही संकल्पना साकारत प्रत्येक क्षेत्रात आपला पाय रोवण्याचे कार्य केले आहे. जे खूपच उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, रंजना देशमुख, माधुरी पाटील, वसुंधरा लांडगे, भारती गाला, डॉ. मंजुश्री जैन, माधुरी भांडारकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती पाटील, प्रा. नयना नवसारीकर यांनी तर आभार प्रा. शिला पाटील यांनी मानले.