बोदवड (प्रतिनिधी) आज जागतिक एड्स दिनानिमित्त बोदवड आयसिटीसीच्या वतीने बोदवड येथील बस स्टँड येथे एड्स विषयी मार्गदर्शन पर पोस्टर प्रदर्शनी जनजागृती करण्याच्या उद्देशाने लावण्यात आले होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.तसेच आयईसीचे वाटप करण्यात आले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी राज्य परिवहन चे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.तसेच कार्यक्रमासाठी समुपदेशक विजय शिरसाट,लॅब टेक्निशियन किशोर सोनवणे व एल.डब्ल्यू. उषा पवार यांनी परिश्रम घेतले.