जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९८४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ११९५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २११, जळगाव ग्रामीण-७५, भुसावळ- ७८, अमळनेर-३७, चोपडा-१२, पाचोरा-१७, भडगाव-३४, धरणगाव-४६, यावल-६७, एरंडोल-७३, जामनेर-२०, रावेर-८६, पारोळा-०६, चाळीसगाव-५९, मुक्ताईनगर-१५८, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०५ असे एकुण ९८४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १०५ हजार १३६ पर्यंत पोहचली असून ९१ हजार ६९९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १८४८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११५८९ रुग्ण सध्या उपचार घेताय.