जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ५११ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ३१३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २६७, जळगाव ग्रामीण-१२, भुसावळ- ३१, अमळनेर- ०१, चोपडा-३८, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-१६, यावल-०२, एरंडोल-०७, जामनेर-७८, रावेर-०६, पारोळा-०६, चाळीसगाव-१२, मुक्ताईनगर-२१, बोदवड-१४, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ५११ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ६४ हजार ५४३ पर्यंत पोहचली असून ५८ हजार ५३५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १४०४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ४६०४ रुग्ण सध्या उपचार घेताय.