मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना, मागील दोन दिवसांपासून काहीसा रुग्णसंख्यावाढीला ‘ब्रेक’ लागल्याचं चित्र आहे. मात्र मंगळवारी (मागील २४ तासांत) कोरोना आणि नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. राज्यात आज तब्बल ३४ हजार ४२४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १८ हजार ९६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
राज्यात ३४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात ३४ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत १२८१ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी ४९९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात ओमायक्रॉन ७८२ रुग्ण आहे
राज्यात आज २२ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात २२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २.०२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या २ लाख २१ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत ६६ लाख २१ हजार ०७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के आहे. सध्या राज्यात १४ लाख ६४ हजार ९८७ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर ३०३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०९, २८,९५४ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत नवे ११ हजार ६४७ कोरोनाबाधित
मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत ११ हजार ६४७ नवे कोरोनाबाधित समोर आले असून दोन जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी तब्बल १४ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांवर कायम राहिला असून मागील २४ तासांत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १६ हजार ४१३ झाली आहे.