नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनास्थिती दिवसागणिक गंभीर बनत असून रुग्णसंख्या नवनवे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. देशात गेल्या २४ तासांत आत्तापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना मृतांची नोंद झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोना मृतांचा आकडा ३२९३ वर पोहचला आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नवे कोरोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे ३२९३ रुग्णांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्याच्या घडीला २९ लाख ७८ हजार ७०९ अॅक्टिव्ह रुग्ण असून १४ कोटी ७८ लाख २७ हजार ३६७ जणांचं लसीकरण झालं आहे.
राज्यात मंगळवारी ६७ हजार ७५२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३६ लाख ६९ हजार ५४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८३.२१ टक्के झाले आहे. राज्यात आज ८९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.०५ टक्के एवढा आहे.