धरणगाव(प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथे आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली वाहिली. शिक्षिका पुष्पलता भदाणे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. देशासाठी समर्पित भावनेने खेळणं काय असतं याचं उदाहरण हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातून शिकता येऊ शकते, असे प्रतिपादन पुष्पलता भदाणे यांनी केले. याप्रसंगी इयत्ता ६ वी चा विद्यार्थी जुएब शेख याने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्यासह भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, स्वाती भावे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, अमोल सोनार, सागर गायकवाड, लक्ष्मण पाटील हे सर्व शिक्षकवर्ग तसेच इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख, सरला पाटील, शितल सोनवणे हे शिक्षकेतर कर्मचारी तसेच नर्सरी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पुष्पलता भदाणे यांनी केले.