TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

योगेश पाटील राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित !

महसूल विभागातील उल्लेखनिय कार्याबद्दल गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2022
in बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्था नाशिक’ यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून योगेश पाटील यांना ‘शिवपुत्र महाराष्ट्र गौरव’ या राज्यस्तरीय पुरस्काराने नगर येथील माऊली सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक, कवी फ.मु. शिंदे यांच्या हस्ते नुकतेच सन्माणित करण्यात आले.

आईच्या न्यायालयात सर्व गुन्हे माफ असतात. आईने दिलेल्या संस्काराची, ज्ञानाची शिदोरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडते. भारतीय संस्कृती महान आहे. तिचा वसा घेऊन आपण सर्वजण पुढे जात आहोत. आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वांनी केलेल्या कामामुळे भारत लवकरच विश्वगुरु होईल, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, साहित्यिक, कवी फ.मु. शिंदे यांनी कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरीया होत्या. यावेळी संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नागेबाबा उद्योग समुहाचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, पुरुषोत्तम गड्डम व संभाजी पाटील उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

नाशिक येथील शिवपुत्र संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था या राष्ट्रीय उपक्रमशिल संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक तथा राजकिय व प्रशासकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार व शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

या कार्यक्रमात निलेश लंके पारनेर आमदार विधानसभा, माणिक आहेर उपविभागीय अधिकारी वैजापूर, योगेश पाटील अव्वल कारकून उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव, डॉ. पीयुष पाटील प्राईम केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल नगर, राहुल पवार उद्योजक तथा अध्यक्ष मराठा प्रिमियर लीग जळगाव, डॉ. मोसिम शेख मंडळ अधिकारी राहाता ता. नगर, साहेबराव मेंगडे संचालक अमृत फुड्सव हर्बल्स प्रा.लि., भानुदास मस्के सेवानिवृत्त नायब तहसीलदार संभाजीनगर यांचा राज्यस्तरीय शिवपुत्र पुरस्काराने व वीर पत्नी छाया उदार, रुपाली कदम, शीतल महाले लेखाधिकारी नियोजन विभाग औरंगाबाद यांचा राज्यस्तरीय शिवकन्या पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

अव्वल कारकून योगेश पाटील हे प्रारंभी महसूल सहाय्यक पदावर रुजू झाले. त्यांना महसूल सहाय्यक पदावर असताना दोन वेळा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले. मंडळ अधिकारी बोदवड पदावर कार्यरत असताना सन 2013-14 मध्ये जिल्हास्तरावरील पुरस्कार व सन 2015-16 मध्ये महाराजस्व अभियानामधील उल्लेखनीय कामकाजामुळे ‘उत्कृष्ट मंडळ अधिकारी’म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारासाठीसुद्धा शिफारस करण्यात आली. तसेच अव्वल कारकून पदावर कार्यरत असताना तत्कालीन महसूल मंत्री मा. चंद्रकांतजी पाटील यांच्या हस्ते आपणास सन 2016-17 चा ‘उत्कृष्ट अव्वल कारकून’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जळगाव जिल्ह्याच्या 7/12 संगणकीकरणातील व जुन्या अभिलेख स्कॅनिंगच्या कामकाजाचा आलेख उंचावल्याने त्यांना सन 2017-18 मध्ये राज्यस्तरीय पुरस्कारासाठीही शिफारस करण्यात आली. कोरोना संक्रमणातील काळात अडकलेल्या नागरीकांना दिलासा देण्यासाठी ई-प्रवास पासची जबाबदारी यशस्वी पार पाडल्याने त्या कार्याची पावती म्हणून मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील, पालकमंत्री जळगाव यांनीही सन्मानित केले आहे. याची दखल घेत नाशिक येथील शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने योगेश पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार देऊन सन्माणित करण्यात आले.

संस्थेच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून राज्यस्तरीय शिवपुत्र व शिवकन्या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. छत्रपती संभाजीराजे यांच्या नावाने हा सन्मान दिला जातो. समाजामध्ये चांगले काम करणाऱ्यांची संस्थेने दखल घेतली आहे. समाजकार्यातुन राष्ट्रउभारणीचा पाया उभा राहतो. त्यासाठी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहणे गरजेचे असल्याचे प्रास्ताविकात जगन्नाथ पाटील म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
Next Post

धरणगावात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी ; भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Tata Motors ने ७०० कोटींची काढली नवी कंपनी ; जाणून घ्या… काय आहे कंपनीचे नियोजन !

December 24, 2021

महिलेचे दागिने आणि रोकड लांबवली !

October 17, 2022

धरणगाव श्री.बालाजी वहनोत्सव : पोलिस कर्मचाऱ्यांचा हस्ते सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान !

October 17, 2024

स्वच्छतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारे काम महाराष्ट्रात होईल : ना. गुलाबराव पाटील

June 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group