जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपूलाजवळ एस.टी.बसने समोरून धडक दिल्याने शिवाजी नगरातील तरुणी जखमी झाली आहे. जखमी तरुणीच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिवाजी नगरातील राशी जगदीश पटेल ही तरूणी मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता दुचाकीने (क्र. एमएच.१९.एए.५९५८) क्रिकेटच्या क्लासला गेली होती. क्लास संपवून ती सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने घराकडे जाण्यासाठी निघाली. याचवेळी शिवाजीनगर उड्डाणपूलाजवळ इदगावकडून आलेल्या एसटी बसने तिच्या दुचाकीला समोरून धडक दिली. हा अपघात होताच राशी ही जखमी होऊन बेशुध्द झाली. त्यानंतर तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जखमी राशीच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात एस.टी.बस चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. संजय झाल्टे हे करीत आहेत.