जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जुन्या वसाहत भागात वास्तव्याला असलेल्या चोविस वर्षीय विवाहीतेला तुझे माझ्या सोबत प्रेमसंबध व अनैतीक संबध असल्याचे सांगून देण्याची भिती दाखवत तसेच मुलांना मारुन टाकण्याची धमकी देत पिडीतेवर गेल्या पाच वर्षापासुन तरुणाने ब्लॅकमेलींग करुन अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, ग्रामीण भागातील रहिवासी तरुणीचे जळगाव शहरातील खासगी वाहन चालका सोबत विवाह झाला असून त्यांना तीन आपत्ये आहेत. अविवाहीत असतांना तिच्याशी ओळख असणाऱ्या किशोर कांबळे (रा.केसीई पार्क) या भामट्याने नवऱ्याची भिती दाखवुन बोलणे सुरु केले. नंतर तीच्याशी बळजबरी संबध ठेवले. पती नसतांना मुलांना मारुन टाकण्याची धमकी देत पिडीतेचे गेल्या पाच वर्षापासुन शोषण करत असल्याचे महिलेने तक्रारीत नमुद केले आहे. पती व कुटूंबीयांन विवाहीतेला धिर दिल्याने तीने आज पोलिस ठाण्याची पायरी ओलांडत घडला प्रकार सांगीतला. विवाहीतेच्या तक्रारीवरुन किशोर कांबळे याच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.