जळगाव (प्रतिनिधी) चहाच्या हॉटेलवर बसलेले असतांना याला फार मस्ती आले असे म्हणत डिगंबर प्रभाकर काळे (वय ४०, रा. विटनेर, ता. जळगाव) याला चौघांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांनी लोखंडी सळई सह लाकडी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १९ रोजी गावातील बस स्टॉपसमोर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील विटनेर येथील डिगंबर काळे हे दि. १९ रोजी गावातील बस स्टॉपजवळ असलेल्या चहाच्या दुकानात बसलेले होते. यावेळी सुशिल साबळे, भिकन साबळे, सौरव खडके व गौरव खडके हे चौघे तेथे आले. त्यांनी काळे यांना बघून याला फार मस्ती आली आहे असे म्हणत शिवीगाळ केली. यावेळी त्यांच्यातील वाद वाढतच गेल्याने सुशिल साबळे याने लोखंडी सळईने तर भिकन साबळे याने लाकडी काठीने त्यांना मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील करीत आहे.