जळगाव (प्रतिनिधी) हॉटेलमधून जेवण करून निघाल्यानंतर सैय्यद जावेद सैय्यद अजीज (वय ३९, रा. शाहू नगर) यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. २७ ऑक्टोबर रोजी रात्री हॉटेल साई पॅलेस समोर घडली.
याप्रकरणी अनोळखी दोन जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शाहू नगरात राहणारे सैय्यद जावेद सैय्यद अजीज हे मित्रांसोबत खोटेनगर जवळील हॉटेलवर जेवणासाठी गेले होते. जेवनानंतर दोघेजण हॉटेलच्या बाहेर आले. त्या वेळी एका दुचाकीवर आलेल्या अनोळखी दोन दोघांनी सैय्यद जावेद यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली आणि त्यांच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. जखमी सैय्यद यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दि. २८ ऑक्टोबर रोजी तालुका पोलिस ठाण्यात अनोळखी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहेत.
 
	    	
 
















