TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणांनी कुटुंबियांसह देशविकासालाही हातभार लावावा : ना. गुलाबराव पाटील

खान्देश करिअर महोत्सवात दिली भेट, दिवसभर तरुणांची गर्दी

vijay waghmare by vijay waghmare
April 11, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आजचे तरुण उच्चविद्याविभूषित आहेत. हुशार आहेत. ज्ञान, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, साहित्य अशा सर्वच क्षेत्रात आजचे तरुण अग्रेसर आहेत. देशासाठी काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द त्यांच्याकडे आहे. शिक्षण आणि काम करण्याची उर्मी असूनही त्यांच्या हाताला रोजगार नसेल तर त्यांच्यासाठी “खान्देश करिअर महोत्सव” महत्वाची भूमिका बजावत आहे. तरुणांनी अपेक्षित क्षेत्रात नोकरी मिळवून कुटुंबियांसह देशविकासालाही हातभार लावावा, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

सुर्या फाऊंडेशनतर्फे खान्देशातील विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण करणारा “खान्देश करिअर महोत्सव” दि. १०, ११ व १२ एप्रिल रोजी जळगाव येथे शिवतीर्थ मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवामध्ये ना. गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी दि. ११ एप्रिल रोजी संध्याकाळी उपस्थिती देऊन युवकांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कवी अनतकुमार राऊत, सामाजिक कार्यकर्ते विशाल भोळे, शालेय पोषण आहार अधीक्षक विजय पवार, सूर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ. अर्चना सूर्यवंशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आजची तरुणाई हीच आपली शक्ती आहे. या शक्तीचा वापर सकारात्मक व्हायला हवा. जगात सर्वात जास्त तरुण भारतात आहे. त्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून रोजगार मिळण्यास मदत होणे हि महत्वाची गोष्ट आहे, असे ना.गुलाबराव पाटील म्हणाले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑगस्ट 2026 !

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

दिवसभर ५०० पेक्षा अधिक तरुणांनी दिली भेट
विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार, उद्योग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या विविध संधींबद्दल मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी आणि उद्योगजगतातील मान्यवर मार्गदर्शन करीत आहे. या महोत्त्सवाला शुक्रवारी दि. ११ एप्रिल रोजी जवळपास ५०० पेक्षा अधिक तरुणांनी भेट देऊन विविध संस्थांची व रोजगाराविषयी माहिती जाणून घेतली.

कवी अनंत राऊत यांच्या कवितेने भारावले वातावरण
शुक्रवारी दि.११ एप्रिल रोजी सायंकाळी कवी अनंतराव राऊत यांचे “मैत्री आणि करियर” संदर्भात विशेष व्याख्यान झाले. आई-वडिलांचा सांभाळ करा, एक तरी मित्र जपा असा संदेश देत कवी राऊत यांनी समाजातील प्रश्नांवर प्रकाश टाकला. करियर करताना आपण सामाजिक बांधिलकी जोपासण्याला देखील प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले. अनंत राऊत यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या कविता सादर करत श्रोत्यांच्या काळजाला हात घातला. त्यांच्या “शेतकऱ्याचं नशीब फळलं की काय? दिवाळी न्हाय, दसरा न्हाय…” या ओळींनी उपस्थित भावुक झाले.

नागपूर येथील ‘एनडीए’कडून मार्गदर्शन
नागपूर येथील नॅशनल डिफेन्स अकादमी येथील अधिकाऱ्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. संरक्षण दलात असणाऱ्या विविध रोजगाराच्या संधी याविषयी त्यांनी महत्त्वपूर्ण टिप्स उपस्थित तरुणाईला सांगितल्या. कलावंत सोमनाथ पाटील यांनी अतिशय सुंदर असे बासरीवादन केले.

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी, लाभ घेण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा लाभ घेऊन करिअरच्या योग्य दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रत्येक दिवशी आकर्षक बक्षिसे आणि कार्यशाळाआहेत. हा महोत्सव सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत शिवतीर्थ मैदानावर असणार आहे. अधिक माहितीसाठी 8668416383, 993278904, 9175675651 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण व समारोप
महोत्सवाचा समारोप दि.१२ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता शालेय शिक्षण मंत्री ना.दादा भुसे अध्यक्षतेखाली होणार आहे. यादिवशी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार असून शालेय संस्थाना पुरस्कार व आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYouth should contribute to the development of the country along with their families: Na. Gulabrao Patil

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑगस्ट 2026 !

August 26, 2026
गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2026 !

August 25, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 12 एप्रिल 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला ‘डोमिनिका’ येथून अटक !

May 27, 2021

मोठी बातमी : शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला, भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता ! 

July 2, 2022

रामजन्मभूमी खटल्याचा निकाल धर्माच्या नव्हे तर कायदे आणि संविधानाच्या आधारावर : रंजन गोगोई

November 30, 2021

Weekly-Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १६ ते २२ एप्रिल २०२३ !

April 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group