पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव-शिरसोली रस्त्यावर झालेल्या अपघातग्रस्तांच्या मदतीला जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आज धावून आले. जखमींना त्यांनी जळगावला उपचाराठी रवाना केले.
जळगाव येथील जळगाव-शिरसोली रस्त्याला सुभाषवाडी येथील कुटूंब आपल्या मोटारसायकलने रावेर येथे अंत्ययात्रेसाठी जात होते. अचानक त्यांची मोटरसायकल घसरत अपघात झाला. याच वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील हे आपल्या दैनंदिन कार्यक्रमासाठी जळगाव येथून लोणवाडी येथे जात होते. प्रतापराव पाटील यांनी तात्काळ आपले वाहन थांबवीत अपघातग्रस्तांना उचलून त्यांना जळगावला डॉक्टर ए.जी. भंगाळे यांच्याकडे उपचारासाठी पाठीवले. तसेच अपघातात बाबत नातेवाईकांना मोबाईल फोनद्वारे माहिती दिली. दरम्यान, अपघातग्रस्तांनी प्रतापराव पाटील यांचे आभार मानले.
















