जळगाव (प्रतिनिधी) जामनेर येथील जिल्हा परिषदच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या 200 कोटीच्या अपहार उघडकीस आल्यानंतर आज जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या गटनेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विजय भास्करराव पाटील यांनी जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये 200 कोटीचा अपहार झाल्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर या अपहार आहात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे दोघे लाभार्थी असल्याचा आरोप केल्यानंतर तर प्रचंड खळबळ उडाली होती दरम्यान या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद मधील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गटनेत्या सह आदी पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यात राष्टवादीचे गटनेते शशीकांत साळुंखे,शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील,काँग्रेस गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे,राष्ट्रवादीचे उपगटनेते रविन्द्र पाटील, माजी आ. गुरुमुख जगवाणी, अशोकलाड वंजारी,अशोक पाटील(सरचिटणीस रा,काँ) सुनील माळी, डॉ. अभिषेक ठाकूर, सुहास चौधरी आदी उपस्थीत होते.
या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी जामनेर येथील 200 कोटीच्या अपहरा सह आरोग्य विभागातील निघालेल्या काही बिले यासह विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान, या भेटीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
















