अमळनेर (प्रतिनिधी) ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा.जयश्री दाभाडे साळुंके यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन केंद्रिय कार्यालय प्लॉट नं.३५ गोंडवाना नगर क्र.०२,बेलतरोडी रोड, पोस्ट-धेसा,नागपूर – मुख्य शाखा असलेल्या जळगाव जिल्हातील अधिकारी व कर्मचा-यांची ऑनलाईन व्हॉटसअप गृपवर सभा घेण्यात आली. या सभेत जिल्हातील सदस्यांनी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हा शाखा स्थापन करण्याचे ठरले व सर्वानुमते खालील पदाधिका-यांची निवड करण्यात आलेली आहे.
सर्व विभागातील आदिवासी अधिकारी व कर्मचारी तसेच कामगार या वर्गाचे शासकिय निमशासकिय प्रशासकिय कामकाजासंबंधी अडचणी व सामाजीक आणि कायदेशिर लढा देण्यासाठी जळगाव जिल्हा कार्यकारणीची सन २०२०-२०२३ या 3 वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे.
जळगाव जिल्हा कार्यकारणी महिला उपाध्यक्षपदी प्रा.जयश्री दाभाडे साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. प्रा जयश्री दाभाडे ह्या गेल्या 24 वर्षांपासून महिला महाविद्यालयात व्याख्याता पदावर कार्यरत आहेत. आपल्या अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना नोकरी क्षेत्रात कार्यरत नोकरदारांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न शील असतात.संपुर्ण महाराष्ट्रात नोकरदार वर्गाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी आंदोलने देखील केले आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेत ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या जळगांव जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारिता,शैक्षणिक,सामाजिक,राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या निवडीबद्दल त्यांचे कौतुक केले.