धरणगाव (प्रतिनिधी) शहराला १५ ते २० दिवसाआड पाणी पुरवठा स्थानिक नगरपालिका करत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरु असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय एकनाथ माळी (रा.हनुमान नगर) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय माळी यांनी आपल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत धरणगाव शहराला १५ ते २० दिवसाआड पाणी पुरवठा स्थानिक नगरपालिका करत आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. गावाला हि समस्या परत उदभवणार नाही, अशी उपाययोजना करण्यात यावी. व पाच दिवसाआड नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. तसेच धरणगावचा पाण्याचा प्रश्न स्वातंत्र्यपासून आजपर्यंत मिटलेला नाही. तरी सदर विषयावर त्वरित कारवाई करण्यात यावी, असेही पत्रात म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या निवेदनाच्या प्रति राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार नितीन देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना पाठवण्यात आल्या आहेत.