चाळीसगाव (प्रतिनिधी) विषारी सर्प म्हटलं की, अनेकांची भंबेरी उडते. मात्र, सर्पमित्र मयूर कदम याने अतिविषारी असलेला घोणस विषारी सर्प पकडल्यानंतर शेतकऱ्यांनी मयूरचे कौतूक केले.
दि. 11 रोजी तालुक्यातील ओझर शिवारातील शेतात दुपारी 4-45 वाजता पकडला. त्यावेळी उपस्थित शेतकरी यांनी मयुरचे कौतुक केले. ओझर शिवारातील चेतन वानर देव मंदिर जवळ महेश देवरे यांच्या शेतात विषारी घोणस सर्प असल्याची माहिती सर्पमित्र मयुर कदम ( 91582 41685, रा. पंचशील नगर ग्रामीण रुग्णालयाजवळ चाळीसगाव) यांना मिळाल्यावर त्यांनी तात्काळ तेथे जाऊन घोणस विषारी सर्प पकडला. यावेळी उपस्थित शेतकरी यांनी मयुरचे कौतुक केले.