जळगाव (प्रतिनिधी) कापडी पिशवीत पैसे ठेवून फुले मार्केटमध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकर्याजवळील सुमारे चार हजार 500 रुपयांची रोकड चोरट्याने चोरुन नेली.
शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता फुले मार्केट परीसरात ही घटना घडली. याप्रकरणी सुवर्णसिंग भरतसिंग राजपूत (51, गणेश कॉलनी) या शेतकर्याने तक्रार दिल्यावरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.तपास हवालदार राजकुमार चव्हाण करीत आहेत.