वर्धा (वृत्तसंस्था) भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या धडकेत ४ महिन्यांच्या चिमुकल्यासह आईचा मृत्यू झाला आहे. शीतल भूषण सावध (२९) आणि अंशू भूषण सावध (४ महिने) अशी मृतांची नावं आहेत. तर जखमी असलेल्या पती भूषण सावध यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मांडवा येथील भूषण सावध त्यांची पत्नी आणि मुलासह दुचाकीने सावंगीकडून मांडवा येथे घरी जात होते. सैनिक ढाब्याच्या जवळ ट्रॅव्हल्सने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेमुळे ती दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत गेली. या अपघातात तिघांनाही जबर दुखापत झाली. या अपघातात शितल सावध आणि मुलगा अंशू सावध यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर भूषण सावध यांना गंभीर दुखापत झाली आहे.
















