धरणगाव (प्रतिनिधी) येथील एकाच घरातील दोन तरुण व साकरे येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे. त्यामुळे शासनाने त्यांना शासकीय सवलतीत रेशन व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा द्यावा, अशी मागणी लाडशाखीय वाणी समाजाच्या वतीने तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना वाणी समाज पंच मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे धरणगाव वाणी समाजाचे एकाच घरातील दोन तरुण समाज बांधव व साकरे येथील एकाच कुटुंबातील चार समाज बांधव यांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्याने परिवार हतबल झाला आहे. दोघं परीवारात कमावता व्यक्ती कोणीच नसल्याने शासनाने त्यांना शासकीय सवलतीत रेशन व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार श्री. देवरे यांनी त्या कुटुंबाच्यां घरी भेट देऊन शासकीय लाभ मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. तसेच धरणगाव वाणी समाज मंडळ हे सुद्धा त्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करेल असे समाजाच्यावतीने ग्वाही देण्यात आली. निवेदन देतांना सुधाकर वाणी, नगरसेवक ललित येवले, चंद्रकांत अमृतकर, विलास नाना येवले, किरण वाणी, नारायण वाणी, प्रविण कुडे, योगेश येवले, अजय मालपुरे, बिपीन अमृतकर, साकरे येथील संजय वाणी, दिपक वाणी, टिकुं मुसळे यांच्यासह वाणी समाजातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.