धरणगाव (वृत्तसंस्था) रथोत्सवाची परंपरा अखंड चालू राहावी म्हणून रथाची यथासांग पूजा केली जाणार आहे. यावेळी ना. गुलाबराव पाटील, खासदार उन्मेशदादा पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी उपस्थित राहणार आहेत.
२७ ऑक्टोबर निघणारा रथोत्सव यावर्षी स्थगित केला आहे. रथोत्सवाची परंपरा अखंड चालू राहावी म्हणून रथाची यथासांग पूजा केली जाईल. बालाजी भगवानांना रथावर विराजमान केले जाणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार उन्मेशदादा पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, तहसीलदार नितिनीकुमार देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार व एपीआय पवन देसले यांच्या हस्ते मंदिर प्रांगणात आरती होईल. त्यानंतर १० फूट ओढला जाईल व लगेच पूर्ववत जागेवर आणला जाईल. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्कचा वापर व सॅनिटायजेशन या गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातील. रथाची सजावट, रोषणाई करून, जागेवर भाविकांच्या दर्शनासाठी व्यवस्था केली जाईल. भाविक भक्तांनी सर्व नियमांचे पालन करून आपले श्रद्धास्थान श्री बालाजी भगवानांचा दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन मंडळातर्फे अध्यक्ष प्रा.डी.आर.पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, जिर्णोद्धार समिती प्रमुख जीवनसिंह बयस, सचिव राजेंद्र पवार, सहसचिव प्रशांत वाणी, अशोक येवले व मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले आहे.