जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ते शिरसोलीच्या दरम्यान आज दुपारी रेल्वे घसरल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. परंतू थोड्याच वेळात हे ‘मॉक ड्रील’ असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यामुळे सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.
आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव ते शिरसोलीच्या दरम्यान एका एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडत प्रशासनाची धावपळ सुरु झाली. परंतू साधारण अर्धा तासाने हे मॉक ड्रील असल्याची अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाने जाहीर केली.
















