लखनौ (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अनेकवेळा दहशतवाद्यांकडून धमकी मिळालेल्या आहेत. गुप्तचर खात्यानेही यासंबंधी वेळोवेळी पूर्वसूचना दिली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेप्रमाणे योगी आदित्यनाथ सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय उत्तर प्रदेशच्या कॅबिनेटने घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेप्रमाणे वाढवण्याचा निर्णय उत्तर प्रदेशच्या कॅबिनेटने घेतला आहे. यासंबंधी उत्तर प्रदेश कॅबिनेटने शुक्रवारी एक बाय सर्क्युलेशन पास केले आहे. योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. या आधी दहशतवाद्यांच्या धमक्या लक्षात घेता त्यांचे ‘लोकभवन’ हे कार्यालय बुलेट प्रूफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, योगी आदित्यनाथांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसंबंधी असणाऱ्या ब्लू बुकचा अभ्यास केल्यानंतर ही शिफारस केली होती. केंद्रातील एसपीजी सुरक्षेच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये स्पेशल सिक्युरिटी ग्रुप (एसएसजी) ची स्थापना करण्यात आली आहे. यात पीएसी कमांडो आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दुसरीकडे योगी यांचे निवासस्थान ‘गोरखनाथ मंदिर’ या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि बॅरिकेटस् वाढवण्यात आले आहेत.