जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या महामारीत देश आर्थिक संकटातून जात आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याऐवजी कांदा निर्यात बंदी केल्याने बळीराजाला अडचणीत आणले आहे. कांदा निर्यात बंदी म्हणजे केंद्राने शेतकऱ्यांची केलेली अवहेलना असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमख गुलाबराव वाघ यांनी केला आहे. ते केन्द्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णया विरोधातजिल्हाधिकरी कार्यालयासमोर शिवसेनेच्या आंदोलनावेळी पत्रकारांशी बोलत होते.
शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला असतांना कांदा निर्यात बंदी केली आहे. या निर्णयाचा शिवसेना निषेध करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस असून आजच्याच दिवशी शेतकरी त्यांचा निषेध करीत असल्याचे सांगून शिवसेना जिल्हाप्रमख गुलाबराव वाघ यांनी कांदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी अशी मागणी केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तात्काळ केंद्राशी बोलणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. यावेळी केंद्र सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनप्रसंगी शिवसेना महागराध्यक्ष शरद तायडे, तालुका प्रमुख राजेद्र चव्हाण, प्रकाश पाटील, देवीदास पवार, ओगल पांचाळ, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरडकर, योगेश सपकाळे, ईश्वर राजपूत, जितू साळुंके, शंतून वानखेडे, जनार्दन सपकाळे, नितीन सपके, विजय बांदल,जाकीर पठाण, इकबाल शेख, रइस शेख, हेमंत महाजन आदी उपस्थित होते.