जळगाव (प्रतिनिधी) कौटुंबिक वादातून एका विवाहितेला पती, दीरसह दोघांनी मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पुष्पा आनंद सोनवणे (वय ३८ वर्ष, राहणार मोहन नगर, महाबळ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील दहा वर्षापासून त्या पतीपासून विभक्त राहतात. त्यांना अर्णव नावाचा एक मुलगा आहे. दि. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांना लहान भाऊ संभाजी कडू सपकाळे याने फोन करून सांगितले की, माझे पाहुणे आनंदा सोनवणे हे मला शिवीगाळ करत असून ते आता मोहाडी रोडवर बाबा गेलाराम कुटिया जवळील पेट्रोल पंपाजवळ थांबलेले आहेत. त्यानंतर मी भावाला केलेल्या शिवीगाळचा जाब विचारण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी माझे पती आनंदा दिगंबर सोनवणे आणि गोपाल काशिनाथ सोनवणे, बाबा एकनाथ सोनवणे, पिंटू जनार्दन सोनवणे (सर्व. रा. सुजदे, ता. जळगाव) यांना विचारले की, तुम्ही विनाकारण माझ्या भावाला शिवीगाळ का केली?. जाब विचारल्याचा राग आल्याने माझे दीर गोपाल काशिनाथ सोनवणे यांनी लाकडी दांड्याने माझ्या उजव्या हातावर मारून दुखापत केली. तर माझे पती यांनी देखील मला लाथाबुक्क्यांनी मारले व आबा एकनाथ सोनवणे, पिंटू जनार्दन सोनवणे यांनी मला अशी शिवीगाळ करत तुला आम्ही सोडणार नाही अशी धमकी दिली. एवढेच नाही तर माझ्या लहान मुला मुलगा याला देखील साप्ता बुक्क्यांनी मारहाण केली. सदरची भानगड ही विक्की साळुंके यांनी सोडवा-सोडवा केली. दरम्यान, यासंदर्भात चौघां आरोपींविरुद्ध भादवि कलम ३२४,३२३, ५०४, ५०६,२९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील, लोकमान तडवी हे करीत आहेत.