जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नाथ वाडयाच्या मागे लक्ष्मी नगरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख ५५ हजार ९०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सर्फराज ईस्माईल तडवी (वय ६०, रा. नाथ वाडयाच्या मागे लक्ष्मी नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांनी १६ ते २२ जुलैच्या दरम्यान, घराच्या मेन दरवाज्याचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला. त्यांतर घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सोने-चांदीचे दागीने, रोख रक्कम व मोबाईल असा एकुण एकूण १ लाख ५५ हजार ९०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि कठोरे हे करीत आहेत.
















