जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसीतील ममता बेकरी जवळ उभा असलेला ट्रक अज्ञान आरोपींनी पेटवून दिल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
एमआयडीसीतील सुप्रीम कॉलनीतील ममता बेकरी जवळ उभा असलेला ट्रक अज्ञान आरोपींनी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास पेटवून दिला होता. त्यामुळे परिसरात मोठे आगीचे लोळ दिसत होते. मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत एमआयडीसी पोलिसांना फोन वरून माहिती दिली. दरम्यान, हा ट्रक कुणाचा होता आणि कुणी पेटवून दिला याबाबत अधिक अद्याप मिळू शकलेली नाही. परंतू मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.