TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोनक नदीवरील बंधाऱ्याचे निधीअभावी काम रखडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2020
in यावल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) येथील परिसरातून वाहणाऱ्या भोनक नदी पात्रात हातनुरच्या पुलाजवळील साठवण बंधाऱ्याचे काम गेल्या तब्बल दोन वर्षापासून निधीअभावी रखडले आहे. बंधाऱ्याच्या भिंतीत नुसत्या निडल (फळ्या) टाकल्या गेल्या नसल्याने हातनूर मधील सांडव्याचे पाणी वाया जात आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

शासनच्या मृद व जलसंधारण विभाग (जळगाव) मार्फत साकळीसह परिसरातून वाहणार्‍या भोनक पात्रात हातनूरच्या पुलाजवळ पाणीसाठवण बंधाऱ्याचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून करण्यात आलेले आहे. बंधाऱ्याच्या भिंतीत नदीच्या पुराचे पाणी व माती- गाळ वाहून जाण्यासाठी सहा ठिकाणी मोकळे भाग(गाले) ठेवण्यात आलेले आहे. या मोकळ्या भागांच्या ठिकाणी पावसाळा गेल्यानंतर निडल (फळ्या) बसवण्याचे नियोजन होते. मात्र संबंधितांनी मिळालेल्या माहितीनुसार या कामासाठी सध्या निधीच उपलब्ध नसल्याने गेल्या दोन वर्षापासुन या बंधाऱ्यास निडल (फळ्या) बसवण्यात आलेल्या नाही. त्यामुळे या ठिकाणी पाणी साठवण्याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. पावसाळा संपल्यानंतर हातनुरच्या कालव्यातून येणाऱ्या सांडव्यामार्फत सदर बंधाऱ्यात पाणी साठवण करण्याच्या नियोजनातून हा बंधारा बांधण्यात आलेला आहे. या अपूर्ण अवस्थेतील बंधाऱ्याकडे जेव्हा ग्रामस्थांची लक्ष जाते तेव्हा त्यांच्या मनात विविध प्रकारच्या शंका निर्माण होत असतात व अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. कामाच्या बाबत बोट ठेवले जाते. तेव्हा संबंधित विभागाने अपूर्ण बंधाऱ्याच्या कामाकडे तात्काळ लक्ष देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा व कामावर लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी साकळी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

 

गेल्या जवळपास अकरा ते बारा वर्षापूर्वी या बंधाऱ्याचे काम सुरू होऊन काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडले होते. मात्र सध्या पदावर असलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या बंधाऱ्याचे काम मागील वर्षी सुरू झाले होते. त्यानंतर आता या बंधाऱ्याच्या कामावर फक्त निधी उपलब्ध होऊ न शकल्याने काही काम अपूर्ण राहिले. त्यामुळे ‘हत्ती गेला आणि शेपूट राहिली ‘ या म्हणीप्रमाणे या कामाची अवस्था झालेली आहे. त्यामुळे साकळी करांना कधीकाळी पाण्याने तुडुंब भरलेल्या साठवण बंधाऱ्याचे स्वप्न पडले होते व ती स्वप्न आता प्रत्यक्षात पुन्हा एकदा भंगते की काय ? असा संभ्रम निर्माण झालेले आहे. अशा प्रलंबित कामांमुळे शासन व प्रशासन या दोघांचाही साकळी गावाकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते.असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तरी सदरील साठवण बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर निधी उपलब्ध करून पूर्ण केले जावे. अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे कधीकाळी साकळीकरांना एका पाण्याने तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याचे स्वप्न पडले होते मात्र ते स्वप्न आता कायमचे भंगले की काय ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या बंधाऱ्यामुळे गावाची पाणी टंचाई दूर होण्यास खूप मोठी मदत होणार होती मात्र बंधाऱ्याचे काम रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
Next Post

'एनडीए'चे अस्तित्व खरोखर उरले आहे काय? : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड नगरपंचायत : खडसेंना जबर धक्का ; शिवसेना विजयी !

January 19, 2022

एकाच कुटुंबातील ७ मृत्युप्रकरणी खळबळजनक खुलासा ; चुलत भावानेच खून करुन मृतदेह फेकले नदीत !

January 25, 2023

प्रतापराव पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी ; पी एम पाटील यांची मागणी

June 8, 2022

आधी डोळ्यात टाकली मिरची, नंतर अल्पवयीन मुलाच्या मदतीने पत्नीने पतीचा गळा आवळून केला खून !

October 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group