धरणगाव (प्रतिनिधी) येथील पी. आर. हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय शिक्षक तथा लोकमतचे पत्रकार शरदकुमार बन्सी यांचे २२ सप्टेंबर रोजी अकाली दुःखद निधन झाले.तर पी. आर. हायस्कूलचे ज्येष्ठ संचालक पंडितराव हुना बडगुजर आणि पुरूषोत्तमसा मकवाने यांचेही निधन झाले. पी.आर.हायस्कूल सोसायटी आणि धरणगावातील सर्व सामाजिक,राजकीय, शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रारंभी मान्यवरांनी दिवंगतांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. पी.आर.हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिलीप रामू पाटील, राष्ट्रीय काॅग्रेसचे नेते डी.जी.पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,पी.आर.हायस्कूल सोसायटीचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष दिपक आनंदा वाघमारे,माजी जि.प.सदस्य जानकीराम पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय महाजन, राष्ट्रीय चर्मकार संघाचे नेते भानुदास विसावे, नगरसेवक कैलास माळी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, छत्रपती क्रांतीसेनेचे अध्यक्ष लक्षमण पाटील, महात्मा फुले युवा क्रांतीचे अध्यक्ष आर. डी. महाजन, अॅड. वसंतराव भोलाणे साहित्यिक तथा पत्रकार प्रा.बी.एन.चौधरी, पत्रकार भरतकुमार चौधरी,पत्रकार भगिरथ माळी,बी.आर.महाजन,धरणगाव महाविद्यालयाचे प्रा.बी.एल.खोंडे,मुख्याध्यापक संजय अमृतकर आदिंनी शरदकुमार बन्सी,पंडितराव बडगुजर आणि पुरुषोत्तमसा मकवाने यांच्या कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेऊन त्यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव केला.शरदकुमार बन्सी यांच्या आठवणींनी वक्त्यांना मंचावरच रडू कोसळले तर उपस्थितांचे डोळे पाणावले.
कोरोनाशी २८ दिवस संघर्ष करणाऱ्या बन्सींना कोरोनाने हरवलं, कोरोनाच्या बातम्या देणारे बन्सीच कोरोनाच्या बातमीचा विषय झाला, या शब्दात सर्व मान्यवरांनी शरदकुमार बन्सी यांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संजय बेलदार यांनी केले तर आभार आणि समारोप पी. आर. हायस्कूलचे उपमुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले. याप्रसंगी राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक वर्ग,नगरसेवक, पत्रकार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.