मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाकडून कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याचे वृत्त मंगळवारी समोर आल्यानंतर चर्चेला उधान झाले होते. शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचे माहिती समोर आली होती. खुद्द शरद पवार यांनी सरकारचे आमच्यावर जास्त प्रेम असल्याची मिश्कील प्रतिक्रिया दिली होती. परंतू, आता मात्र निवडणूक आयोगाकडूनच अत्यंच महत्त्वाची माहिती देत पवारांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.