TheClearNews.Com
Sunday, December 14, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संकट मे मोदी ; आगे बढे योगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 11, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कोरोना आपत्तीने लोकांच्या जीवनात जशी आपत्ती आणली तशी काही नेत्यांच्या राजकीय आयुष्यात देखील संकटे आणली. विकासपुरुष म्हणून स्वत:ला मांडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छबीला मोठा तडा गेला. याची भरपाई त्यांच्याशी स्पर्धा करू पाहणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिक्षा देऊन केली जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, देशातील सर्वात मोठ्या पर्यायाने सर्वाधिक खासदार पाठविणाऱ्याची क्षमता असलेल्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या परिस्थितीवर मात देण्यात तूर्तास तरी योगी यशस्वी ठरल्याचे चिन्ह आहे.

– श्रीविराज

देशाला पंतप्रधान देणारे किंवा पंतप्रधानांना पाठबळ देणारे राज्य अशीच उत्तर प्रदेशची ओळख आहे. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातसह उत्तर प्रदेशातून देखील निवडणूक लढण्याची खेळी नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्याचा त्यांना २०१४मध्ये तर लाभ झालाच. पण २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही कधी नव्हे ते भाजपच्या वाट्याला घवघवीत यश आले. विधानसभेच्या ४०३ पैकी ३२५ जागा भाजपच्या खात्यात गेल्या होत्या. अर्थात, त्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा चेहरा असला तरी राबणाऱ्या हातांमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, कलराज मिश्रा, मनोज सिन्हा, राजनाथसिंह, मुख्तार अब्बास नक्वी अशी नेत्यांची मोठी फौज होती. परंतु, २०१७ चा विधानसभा निकाल जाहीर होण्याच्या दिवशी सकाळीच ‘मी मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत नाही’ असे सांगत गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी आपला दावा ठोकला होता. अंगावर परिधान केलेले भगवे कपडे आणि प्रचंड आक्रमक भाषा यामुळे हिंदू वाहिनी या संघटनेचे सर्वेसर्वा योगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरले आणि उत्तर प्रदेशच्या सर्वोच्चपदी विराजमान झाले.

 

राज्यातील यशप्राप्तीत विशेष योगदान नसलेल्या मठाधिपती योगींसाठी हिंदुत्वातून विकासाकडे जाण्यासाठी मुख्यमंत्रिपद ही मोठी संधी होती. मात्र, या संधीचे सोने करण्याचे शहाणपण ते दाखवू शकलेले नाही. खुद्द पंतप्रधानांचे निवडणूक क्षेत्र असल्याचा फायदा करून घेत अधिक गुंतवणूक खेचण्याची नामी संधी असताना राज्यातील जाती-धर्माच्या वादाला खतपाणी घालण्यातच त्यांनी अधिक धन्यता मानली. शेजारी बिहारमधील मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पॅटर्नची कॉपी करीत नाही म्हणायला त्यांनी विकास दुबे सारख्या गुंडाचा एन्काउंट करीत गुन्हेगारांमध्ये कायद्याची दहशत निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न केला. मात्र, यातून राज्यातील ब्राह्मण व उच्चवर्णीय मतदार दुखावला गेला. नोकरी-व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत नसल्याने देशभरात नाईलाजाने स्थलांतर करणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणाईला ‘घरवापसी’साठी अशा चकमकी पुरश्या नाहीत.

 

राज्यात कोरोना संकट घोघावत असताना मुख्यमंत्री योगी बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांमध्ये प्रचारसभांमधून हिंदुत्वाचा झेंडा फडकावित होते. राज्यातील जनता ऑक्सिजनविना तडफडून मरत असताना योगींनी राज्यातील या वस्तुस्थितीकडे पुरती डोळेझाक केली. हिंदू धर्मियांसाठी पवित्र असलेल्या गंगा नदीमध्ये जेव्हा मृतदेह वाहून येऊ लागले आणि याच गंगेच्या कुशीत काठावर शेकडो मृतदेह पुरण्यात आले तेव्हा देशाला मोठा धक्का बसला. ‘ज्या राज्यातून पंतप्रधान निवडून येतात, तेथेच अशी दशा असेल तर इतर राज्यांची काय स्थिती असेल’, असा प्रश्न देशांतर्गतच नव्हे तर परदेशातील माध्यमांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देणे उत्तर प्रदेशच काय; केंद्र सरकारलाही शक्य होऊ शकले नाही. त्यांच्या ‘चुप्पी’तच अधोरेखित स्वीकार आला.

 

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेचा अनुभव हाताशी असताना संशयित रुग्णांची संख्या वाढू न देण्यासाठी औषध उपचारापेक्षा अँटिजेन, आरटी-पीसीआर यासारख्या मूलभूत चाचण्या न करण्याचा अनोखा आणि अजब फंडा योगी सरकारने राबविला. याची किंमत जनतेला आपले जीव गमावून जबरदस्त चुकवावी लागली. यावर दिलासा देण्याऐवजी जनतेची दिशाभूल करत स्थानिक वृत्तपत्रांमध्ये स्वत:च्या कौतुकाच्या पानपानभर जाहिराती देण्यात योगींनी धन्यता मानली. विशेष म्हणजे यामध्ये नरेंद्र मोदींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही केंद्रीय किंवा प्रदेश नेत्याचा फोटो वापरण्याची तसदी योगींनी घेतली नाही. उत्तर प्रदेशात भाजपचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे वेध योगींना लागले आहेत. मात्र, त्यासाठी विकासाची नव्हे तर हिंदुत्वाची मोजपट्टी लावावी, अशीच त्यांची अपेक्षा आहे. यासाठी खुद्द मोदींचेच उदाहरण भाजपची पितृसंस्था संघापुढे योगी समर्थकांनी ठेवले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारून जेमतेम वर्ष लोटलेले असताना २००२ मध्ये गोध्रा एक्स्प्रेस जळीतकांड घडले आणि त्यानंतर अहमदाबादसह राज्यात इतरत्र जातीय हिंसाचार उसळला होता. याचा परिणाम म्हणजे ध्रुवीकरण होऊन मोदी सलग तीन वेळा निवडून गेले. या काळात त्यांनी गुजरातचा कायापालट केला. याच ‘दुहेरी’ बळावर केंद्रीय राजकारणात झेप घेतली. ‘ध्रुवीकरणातून विकासाकडे’ असा मोदींची राजकीय प्रवास राहिलेला आहे. त्याचेच अनुकरण करताना योगींनी हिंदुत्वाची चादर अंगावर ओढून घेतली असली तरी विकास आणि लोककल्याण मात्र बाजुला सारल्याचे दिसत आहे.

 

योगींच्या हा चालीकडे मोदींनी दुर्लक्ष केले, असे बिल्कुल नाही. राज्यपालपदी आपल्या मर्जीतील आनंदी पटेल आणि विधान परिषदेत गुजरामध्ये प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या माजी अधिकारी अरविंदकुमार शर्मा यांना पाठविले. मात्र, या दोन्हींसह अन्य कोणालाही हस्तक्षेपाची संधी योगींनी मिळू दिलेली नाही. यात विशेष बाब म्हणजे आता वयाची सत्तरी ओलांडणाऱ्या मोदींसाठी २०२४ ची लोकसभा निवडणूक निवृत्तीपूर्वीची अखेरची ठरू शकते. यापूर्वी वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याची भूमिका मोदींनी घेतली होती. त्यामुळेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांना संधी मिळू शकली नव्हती. याच सूत्राचे २०१९ मध्ये देखील पालन करीत मोदींनी वयोवृद्धांना तिकीट देण्याचेच टाळले. याचा फटका लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना देखील बसला होता. मोदी २०२५ च्या सप्टेंबरमध्ये ७५ वर्षांचे होतील. त्याचा योगींची आताच गांभीर्याने विचार केलेला दिसतो. त्यामुळेच ‘मोदींनंतर कोण’ हा प्रश्न असलेल्या संघापुढे त्यांनी स्वत:चे लॉबिंग केले आहे. आता सहा-आठ महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना लोकप्रिय योजनांना धडक बार उडवित लोकांना लुभाविण्याचा प्रयत्न होईल. दुसरीकडे, विकासापेक्षा हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाची पुन्हा खेळी करीत समाजवादी पक्षाचे अखिलेशसिंह यांना मात देण्याची तयारी केली जाऊ शकतो. राज्यात भाजपने राज्यात सत्ता राखली तर योगींची उंची वाढून ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून चमकले तर आश्चर्य वाटायला नको.
..
(8766891437)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

READ ALSO

अजनाड येथील महिला बचत गट फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

परिट समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे तसेच संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी – आ. एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी

Related Posts

राजकीय

अजनाड येथील महिला बचत गट फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

December 11, 2025
राजकीय

परिट समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे तसेच संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी – आ. एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी

December 10, 2025
चाळीसगाव

कोणता झेंडा घेऊ हाती ? शिंदे सेनेच्या उमेदवारांची किशोर पाटलांच्या भूमिकेमुळे उद्दीन प्रतिक्रिया, शिवसेनेच्याच उमेदवाराच्या विरोधात शहर विकास आघाडीचा प्रचार करणार

November 28, 2025
अमळनेर

अवैध धंद्यांतून पैसे कमावणाऱ्यांनी चारित्र्याच्या गोष्टी करू नयेत… ; राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांचा माजी आमदारांवर निशाणा

November 25, 2025
चाळीसगाव

माजी नगरसेविका व प्रभाग क्र.१० मधील अपक्ष उमेदवार सौ. अलका सदाशिव गवळी यांचा भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा…

November 24, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव नगराध्यक्षपदासाठी प्रतिभा चव्हाण यांच्या उमेदवारीनंतर भाजपचा भव्य शक्तिप्रदर्शन सोहळा

November 17, 2025
Next Post

नाशिक विभागात २९ लाख १३ हजार ६०६ नागरिकांचे झाले लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात 50 लाखांचा गुटखा जप्त ; इंदौरचा कंटेनर चालक जाळ्यात !

August 22, 2023

भडगाव : बसमध्ये चढताना महिलेचे पावणेतीन लाखांचे दागिने लंपास !

February 21, 2024

…तर मी राजीनामा देणाऱ्यांमध्ये सर्वात पहिला असेल : दुष्यंत चौटाला

December 11, 2020

सर्वसामान्यांना दिलासा ! डाळींच्या किंमती घसरल्या

November 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group