जळगाव (प्रतिनिधी) अपंग युनिटवरील विशेष शिक्षकांच्या कागदपत्रांची २०१३ पासून तपासणी सुरु आहे. परंतू मागील ७ वर्षात तपासणीत कुठलीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे कागदपत्रे तपासणीविरूध्द अभिजीत पाटील आणि राजाभाऊ भुतेकर यांनी उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्यात आहेत. कागदपत्रे तपासणीला शिक्षकांचा आक्षेप नाही. मात्र २०१३ पासून कागदपत्रे तपासणी चालू आहे आणि इतक्या वर्षापासून झालेल्या तपासणीत नक्की काय निष्पन्न झाले? काही निष्पन्नच होत नाही तर या तपासण्या कशासाठी?, असा सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारी अनास्थेमुळे आजच्या घडीला जळगाव जिल्ह्यातील साधारण दोनशेहून तर राज्यातील १३५८ विशेष शिक्षक मागील सात वर्षापासून वेतनाविना काम करताय.
याबाबत विशेष शिक्षक अभिजीत पाटील यांच्यासोबत चर्चा करताय विजय वाघमारे !