अमळनेर(प्रतिनिधी) संसदेत नुकत्याच पारित झालेल्या कृषि विधेयकाविरोधात अमळनेर युवक काँग्रेसतर्फे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच मशाल रॅली काढण्यात आली.
संसदेत नुकत्याच पारित झालेल्या कृषि विधेयकाविरोधात देशभरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. भारतीय युवक काँग्रेसनेदेखिल कृषि विधेयका विरोधात देशभरात आंदोलन पुकारले असून स्थानिक पातळीवर अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसने मशाली पेटवून निदर्शने करत सहभाग नोंदविला. जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दगडु पाटील व शहराध्यक्ष तौसिफ तेली यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मंड्या संपतील, आधारभूत किंमतही संपेल, कृषी विधेयक आणून केंद्र सरकारने काळया बाजाराला जवळ असलेल्या बड्या उद्योजकांना परवानगी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाची खुली लूट होईल. शेतकर्यांकडून स्वस्त वस्तू खरेदी करून मोठ्या व्यापार्यांकडून गोदामांमध्ये जमा केल्यावर बाजारात कृत्रिम कमतरता निर्माण करून जनतेची फसवणूक होईल. हवामानास सामोरे जाणार्या शेतकर्याला दिलासा देण्याऐवजी त्याचे शोषण करण्यास केंद्र सरकार झुकले आहे. असा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. या आंदोलनात अमळनेर युवक काँग्रेसचे मा शहराध्यक्ष सईद तेली, अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष महेश दगडु पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, कुणाल चौधरी , मयुर पाटील, ऋषिराज सुर्यवंशी, वैभव पाटील, दुर्गेश पाटील, कुणाल पाटील, मोहम्मद तेली, प्रथमेश पवार, विशाल पवार, अनिकेत पाटील, शुभम खंबायतकर, हर्षल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.