अमळनेर (प्रतिनिधी) मध्यवर्ती सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार दि.१ ते ३० सप्टेंबर दरम्यान अंगणवाडी केंद्रात राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात आले. या अभियानाची सांगता नुकतीच अमळनेर येथे झाली.
अभियान काळात बालकांची काळजी घेणे, गरोदर व स्तनदा मातांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करणे, जनजागृती करणे, गृहभेटी व वजन यावर भर देणे, एक हजार दिवसांचे महत्त्व पटविणे, कुपोषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणे, किचन गार्डन बनविण्यावर भर देणे, यासह अन्य उपक्रम बालविकास प्रकल्प अधिकारी जळगाव (नागरी) विजयसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभर राबविण्यात आले.राष्ट्रीय पोषण अभियानाचा आज शेवटचा दिवस असल्याने मराठी शाळा गांधलीपुरा मधील अंगणवाडी केंद्रात पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे यांच्या उपस्थितीत ‘सही पोषण- देश रोशन’ अशी घोषणा देत सांगता करण्यात आली. यावेळी गरोदर व स्तनदा माता यांच्यासह अन्य लाभार्थ्यी आणि वंदना पाटील, शिला बोरसे,रत्नप्रभा पवार,पुष्पा सोनी,सुनिता नेतकर,सुचिता पाटील,रेखा पाटील,मनिषा चौधरी,प्रतिभा पाटील,ज्योती निकम, सुनंदा धामणे,सुनंदा कांबळे यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.














