जळगाव (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका अल्पवयीन मोटर सायकल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळमधील इराणी मोहल्ल्यातून ताब्यात घेतले आहे.
१३ सप्टेबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पो.हे.का. शरीफ काझी,पो.ना.युनुस शेख,पो.ना. किशोर राठोड ,पो.काँ. रणजित जाधव, पो.हे.का. सुरज पाटील, पो.हे.का. इद्रीस खान, पो.हे.का. राजेंद्र पवार अशांनी डबकी रोड पोस्टे. अकोला भाग 05 सी.आर.नं.292/2020 आयपीसी 379 मधिल संघर्ष विधी बालक (रा परळी जी. बीड, ह.मु. इराणी मोहल्ला, भुसावळ) यास पल्सर मोटर सायकलसह पुढील कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथे जमा केले आहे.