भुसावळ (प्रतिनिधी) कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्र राज्य शासन मार्फत दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होऊनही शिक्षकांचा सत्कार समारंभ झाला नाही. परंतू सभापती पंचायत समिती मनिषाताई पाटील यांनी तालुक्यातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक समाधान रामचंद्र जाधव यांच्या घरी जाऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य शासन मार्फत दिला जाणारा जिल्हा परिषद जळगाव आदर्श शिक्षक पुरस्कार सप्टेंबर 2020 रोजी जाहीर झाला. परंतू या covid-19 या महामारी च्या काळामध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण होऊ शकले नाही. परंतू सभापती पंचायत समिती मनिषाताई पाटील यांनी तालुक्यातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिंदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक समाधान रामचंद्र जाधव यांच्या घरी जाऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
मनिषाताई यांनी संबंधित शिक्षकाच्या घरी जाऊन त्यांना भेटवस्तू, गुलाबपुष्प, शाल देऊन त्यांना सत्कार आणि शुभेच्छा दिल्या. आणि शिक्षकांचा हातून सुसंस्कृत, विद्यार्थी कर्तव्यदक्ष नागरिक, आदर्श अधिकारी,कर्मचारी निर्माण होतो आणि भारताचे भावी विद्यार्थी सुसंस्कृत घडवत या शुभेच्छा दिल्या. मनीषा ताईंनी घरी जाऊन सत्कार केल्याबद्दल सर्व शिक्षकांमधून मनिषाताई यांचे कौतुक होत आहे.