मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी भविष्यात आणखी महत्वाच्या नेत्यांच्या पक्षांतराचे संकेत दिले आहेत.
एकनाथराव खडसे यांचे महाविकास आघाडीतील नेत्यांनी पक्षात स्वागत केले आहे. ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी खडसे तो सिर्फ झाँकी है… असे म्हणत भाजपला धक्का देणार विधान केले आहे. एकनाथराव खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है’, असे म्हणत मुश्रीफ यांनी आणखी नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकांपूर्वी भाजपात गेलेले तसेच काठावरचे अनेकजण राष्ट्रवादीत येतील, असा दावा मुश्रीफ यांनी केला. एकनाथ खडसेंमुळे खान्देशात पक्षाची ताकद वाढेल, त्यांचे राष्ट्रवादी पक्षात आनंदाने स्वागत, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
















