नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एका दिवसात ८२ हजार १७० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत १०३९ करोनारुग्णांचा मृत्य झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोना संक्रमितांचा एकूण आकडा ६० लाखांच्या पुढे गेलाय. रविवारी एका दिवसात ८२ हजार १७० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत १०३९ करोनारुग्णांचा मृत्य झाल्याची नोंद करण्यात आली. दुसरीकडे आनंदाची बाब म्हणजे एकूण ६० लाख कोरोना रुग्णांपैंकी करोना संक्रमणमुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा ५० लाखांच्या घरात पोहचलाय. गेल्या ११ दिवसांत १० लाखांहून अधिक रुग्णांनी करोनावर मात केलीय.