यावल ता.साकळी (प्रतिनिधी) केंद्र शासनाने शेती विषयक अधिवेशनात बहुमताच्या आधारावर विधेयक मंजूर केले हे विधेयक शेतकरी,शेतमजुर यांच्या साठी अत्यंत घातक असून केंद्र सरकार शेतक-यांना संपवण्याचे मोठे छडयंत्र असल्याचे आरोप जि.प. काँग्रेस गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे यांनी केला आहे.
केन्द्र शासनाने नुकतेच मंजूर केलेल्या शेती विषयक विधेयकाच्या निषेधार्थ येथील तालुका काँग्रेस व तालुक्यातील शेतक-यांच्या वतीने २ ते १० ऑक्टोंबर दरम्यान रावेर विधानसभा मतदार संघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलन कार्यक्रम आयोजीत केले आहेत. काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष तथा जि.प. काँग्रेस गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे यांनी बुधवारी येथील खरेदी विक्री संघाचे सभागृहात आयोजीत पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराची माहिती देत पोलखोल केली.
केंद्र शासनाने शेती विषयक अधिवेशनात बहुमताच्या आधारावर विधेयक मंजूर केले हे विधेयक शेतकरी,शेतमजुर यांच्या साठी अत्यंत घातक असून केंद्र सरकार शेतक-यांना संपवण्याचे मोठे छडयंत्र करीत असल्याचे सांगितले.तर जिल्हा इंटकचे अध्यक्ष भगतसिंग पाटील यांनी हे विधेयक शेतकरी आणि सहकार विरोधी असल्याचे सांगून हे बिल मागे घेण्यासाठी काँग्रेसच्या वतीने शेतकरी चळवळ उभारली जात असल्याचे सांगून महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती दिनापासून तर १० ऑक्टोबर 2020 पर्यत तालुक्यातील ग्रामीण भागात व प्रमुख शहरांमध्ये जावून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने आणलेले विधेयक हे शेतकरी विरोधी कसे आहेत हे शेतकऱ्यांना पटवून देऊन विधेयकाविरोधात लाखो शेतक-यांच्या स्वाक्ष-या घेवून शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन महामहीम राष्ट्रपतींकडे पाठवून विधेयक मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेत प्रास्ताविक : यावल शहर काँग्रेस अध्यक्ष कदिरखान यांनी केले आहे तर आभार पक्षाचे पदाधिकारी अनिल जंजाळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष इमरान पहेलवान, गफफारशाह,संदिप सोनवणे, नईम शेख,रहेमान खाटीक, शे.रहेमान,युवा कार्यकर्ते संदीपभैय्या सोनवणे यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सोशल डिस्टन्स चे पालन करून तसेच मास्क लावून उपस्थित होते.