कोल्हापूर (वृत्तसंस्था) फडणवीस हे ड्रायक्लीनर आहेत, हे खडसेंचे वाक्य मला पटले. फडणवीसांनी विनाचौकशी अनेकांना क्लीनचिट दिली आहे. खडसेंवर मात्र अन्याय झाला. खडसेंबद्दल मला सहानुभूती आहे, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोल्हापुरात पत्रकार परिषदेत भाजपमधील फडणवीस आणि खडसे यांच्यातील वादाबद्दल बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘भाजपमधील हा पक्षांतर्गत वाद आहे. पण, फडणवीस हे ड्रायक्लीनर आहेत, हे खडसेंचे वाक्य मला पटले. फडणवीसांनी विनाचौकशी अनेकांना क्लीनचिट दिली आहे. खडसेंवर मात्र अन्याय झाला. खडसेंबद्दल मला सहानुभूती, असल्याचे मुश्रीफ म्हणाले. तसेच राज्यातील सरकार भक्कम असताना त्याला उचकवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा वापर झाला. यानंतर कंगना राणावत आणि रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले जात आहे. कोणताही संबंध नसताना याप्रकरणी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचा आरोप देखील मुश्रीफ यांनी केला आहे.