बीड (वृत्तसंस्था) खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचा प्रश्न त्यांच्या खासदार सूनबाई रक्षाताई खडसे यांना विचारा, अशी प्रतिक्रिया बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.
बीडमध्ये पत्रकारांनी खासदार प्रीतम मुंडे यांना खडसे प्रकरणावर प्रश्न विचारले. अगदी खडसेंच्या संभाव्य पक्षांतरवर थेट प्रश्न विचारण्यात आल्यावर खा.मुंडे म्हणाल्या की, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा निर्णय योग्य वेळ आल्यावरच कळेल, राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचा प्रश्न त्यांच्या खासदार सूनबाई रक्षाताई खडसे यांना विचारा. प्रीतम मुंडेंनी हा प्रश्न त्यांच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे यांना विचारायला हवा असं सांगत खडसेंवर बोलण्यास नकार दिला. खडसे काका यांचा निर्णय योग्य वेळ आल्यावर कळेलच असे सांगायला मात्र, त्या विसरल्या नाहीत. एकनाथराव खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला राज्यात उधाण आले आहे. खडसे येत्या घटस्थापनेला राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा आहे.