धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील सामाजिक कार्यकर्त्या गिता योगेश वाघ यांची राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या धरणगाव शहरध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात ओबीसीच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या तसेच कल्पनाताई मानकर यांच्या नेतृत्वात तसेच मार्गदर्शनात महाराष्ट्र प्रदेश पातळीवर कार्यरत ओबीसी महिला महासंघाच्या धरणगाव शहरध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या गिता योगेश वाघ यांची धरणगाव शहरध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची ध्येय धोरणे राबविणे, तसेच ओबीसी बांधवांच्या कल्याणासाठी संघटना बांधणीच्या पवित्र कार्यात हातभार लावून संघटना मजबुत करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. या नियुक्तीबद्दल गीता वाघ यांचे ओबीसी समुदायातून अभिनंदन केले जात आहे.