TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी

vijay waghmare by vijay waghmare
February 24, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे तीन दिवशीय शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवरायांचे आरमार तसेच अस्सल चित्रे यांचे प्रदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि वैचारिक प्रबोधन यांसारखे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अखिल भारतीय सकल मराठा समाज मंडळ व शिवसह्याद्री प्रतिष्ठान व मित्रपरिवार नशिराबाद आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने धरणगाव येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांचे व्याख्यान दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 7 ते 10 दरम्यान श्री मंगलमूर्ती मंगल कार्यालय नशिराबाद येथे उत्साहात संपन्न झाले. याच ठिकाणी दि. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान शिवरायांचे भव्य आरमार व जहाज व्यवस्था याचे प्रदर्शन महेश पवार (जळगाव) व शिवरायांचा पोशाख आणि जगभरातील अस्सल छायाचित्रे यांच्या प्रदर्शनासाठी संकेत गांगुर्डे (धरणगाव) यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. प्रमोद आमोदकर यांनी मागील दहा वर्षांपासून सुरु असलेल्या शिवजयंती उत्सवाची माहिती दिली. न्यू इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांनी शंभूराजे यांचा जन्मोत्सव व कार्यावरील नाटिका व विलोभनीय नृत्य अतिशय उत्कृष्टरित्या सादर केली, या विद्यार्थ्यांना प्रवीण महाजन यांचे सहकार्य लाभले. तसेच चिमूरडी कुमारी तनिष्का चव्हाण हिने देखील उत्तम नृत्य सादरीकरण करत सर्वांची मने जिंकून घेतली. गोदावरी वैद्यकीय कॉलेज येथील डॉ. आदित्य पाटील यांनी शिवराय यांच्या जीवनावर सादर केलेल्या कवितेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी शिवरायांच्या जीवनातील विविध बाबींवर प्रकाश टाकला. शेतकऱ्यांचे कैवारी, पर्यावरणाचे रक्षक, जलव्यवस्थापन करणारे, आई – वडिलांची आज्ञा मानणारे, रयतेची काळजी घेणारे, आरामाराचे जनक असलेले शिवराय निश्चितच काळाच्या पलीकडे विचार करणारे राजे होते असे प्रतिपादन व्याख्याते पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अतिशय बहारदार शैलीत सूत्रसंचालन बी आर खंडारे यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नशिराबाद नगरीचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, धरणगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष लीलाताई सुरेश चौधरी यांच्या हस्ते महाराजांचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नशिराबादचे नगरसेवक लालचंद पाटील, कीर्तीकांत चौबे, विकास पाटील, मनोज पाटील, विकास धनगर, पराग नारखेडे, बापू बोढरे, चेतन बऱ्हाटे, सचिन हिंगणे, प्रदीप देशपांडे, किशोर पाटील, भूपेश कुलकर्णी, जनार्दन माळी, आनंदराव मराठे, भानुदास मराठे, अवधूत मराठे, मुकुंदा रोटे, प्रकाश माळी, बाळू सोनवणे (नांद्रा ग्रुप) आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्यासमवेत पत्रकार चंदन पाटील, विश्वनाथ महाजन, डॉ. दिपक लोखंडे, हरीष पाटील, सुनिल महाजन, सागर मोरे हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आदरणीय गणेशभाऊ चव्हाण आणि सोनालीताई चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष गोपाल पाटील, उपाध्यक्ष देविदास काकडे तसेच सदस्य किशन साळुंखे, महेंद्र मराठे, अनिल काळे, संजय पाटील, अरुण मराठे, अशोक मराठे, शांताराम मराठे, सुभाष मराठे, सुरेश मराठे, बापू शिंदे, नथ्यू चव्हाण, राहुल मराठे, भरत मराठे, दिपक चव्हाण, जयेश पाटील, लोमेश पाटील, गणेश मराठे, भूषण मराठे, रमेश मराठे, गोकुळ मराठे, ललित मराठे, कुदंन मराठे, पवन मराठे, किशोर चव्हाण, प्रवीण मिस्तरी, युवराज मराठे, शुभम जाधव, किरण नांद्रे, रोहन माळी अभिषेक माळी आदींनी परिश्रम घेतले. शिवजन्मोत्सव कार्यक्रमाला नशिराबाद नगरीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली म्हणून हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
Next Post

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…आणि ‘लाल परी’ मुक्त झाली! ; सदावर्तेंची गाढवाशी तुलना करत शिवसेनेचा हल्लाबोल

April 21, 2022

मराठी प्रतिष्ठानतर्फे पिंक रीक्षा प्रशिक्षण, बाहेरगावच्या महिलांकरीता निवासाचीही सोय : अॅड. जमील देशपांडे

February 17, 2022

पोर्नोग्राफी प्रकरण : राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ

July 23, 2021

फडणवीस बॉम्ब फोडू शकले नाही, मी मात्र हायड्रोजन बॉम्ब फोडणार : नवाब मलिक

November 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group