नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात मागील २४ तासांत ९० हजार ६३३ करोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसांतील सर्वात मोठी वाढ आहे. तर गेल्या २४ तासांत देशात एक हजार ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात पहिल्यांदाच ९० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहून २४ तासांत एक लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढण्याची शक्याता आहे. देशात ४१ लाख १३ हजार ८१२ करोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी सध्या ८ लाख ६२ हजार ३२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७० हजार ६२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.