चोपडा (प्रतिनिधी) अती पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मूग, उडीद, मका, सारखी पिकं संपूर्ण नष्ट झालीत. तर केळी, कापूस या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. काही जमिनी वाहून गेल्या आहेत. अशा सर्व नुकसान ग्रस्त शेतकर्यांच्या जमिनीचा पंचनामा करून तातडीने मदत करण्याची मागणी, चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेतकरी हीत हेच काँग्रेस चे ब्रीद असल्याचे शहर अध्यक्ष के.डी.चौधरी यांनी निवेदन देतांना व्यक्त केले. याबाबतचे निवेदन तहसीलदार चोपडा यांना देण्यात आले. तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार सय्यद साहेब यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनावर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, माजी तालुका अध्यक्ष सुरेश सिताराम पाटील, तालुकाध्यक्ष राजाराम बाबुराव पाटील, शहर अध्यक्ष के. डी. चौधरी, ऊपाध्यक्ष हाजी महेमूदअली सैय्यद, किसान सेलचे अध्यक्ष शशिकांत शांताराम साळुंखे, मार्केट कमिटीचे माजी ऊपाध्यक्ष नंदकिशोर चिंधू साळुंखे, एन. एस. यू. आय. अध्यक्ष चेतन पंढरीनाथ बाविस्कर, शिक्षक सेलचे अध्यक्ष मंगेश रमेश भोईटे, सुनिल हिंमत पाटील, अमजदखान रऊफखान कुरेशी, सूर्यकांत के. चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.