जळगाव (प्रतिनिधी) दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आज दुपारी न्यायालयात हजर केलेल्या दोघां संशयितांना १९ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. रवी मदनलाल अग्रवाल यांना अकोला तर चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम. पाटील (जळगाव) यांना जळगावातून पोलिसांनी अटक केली होती.
दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरिशंकर अग्रवाल यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर पाचवा संशयित आरोपी रवी मदनलाल अग्रवाल (रा. अकोला) याला देखील पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली होती. त्यानंतर आज सकाळी चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम. पाटील (जळगाव) याला शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर दोघांची वैद्यकीय तपासणी करून दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याआधी अटकेतील चारही संशयितांना देखील १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्यामुळे आता १९ नोव्हेंबरला सर्वांना कोर्टात एकत्र हजर केले जाणार आहे. यावेळी तपासाधिकारी सपोनि सपोनि परदेशी हजर होते. या गुन्ह्यात आतापर्यंत सहा जणांना अटक झाली आहे.