जामनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित करताना काढलेला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी त्या दोन नराधमांसह त्यांना मदत करणार्या इतर दोन अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एका १७ वर्षाच्या तरूणीला तालुक्यातील तोरनाळा येथील आकाश सुरेश मुरळकर याने २ एप्रिल रोजी धमकावून बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले होते. यावेळी त्याने शरीर संबंधाचे व्हिडीओ चित्रीकरण केले होते. यानंतर आकाशचा मित्र तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर ) याने १२ जून २०२२ रोजी बुलढाणा येथील एका कॅफेमध्ये पिडीत तरुणीवर अत्याचार केला. यावेळी तुषारने देखील व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर पिडीत तरुणीला व्हिडीओ व्हायरलची धमकी देत ब्लॅकमेलींग सुरु होती. शेवटी पिडीत तरुणीने पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी आकाश सुरेश मुरळकर ( रा. तोरनाळा ) आणि तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणात दोघांना अजून दोघांनी मदत केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे यात एका तरूणीचाही समावेश असून जामनेर येथीलच योगेश लोणारी याच्या विरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांविरुद्ध विरूध्द पोक्सोसह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.